विद्यार्थ्यांना प्रगत आणि उत्तम शिक्षण मिळावं यासाठी ठाकरे सरकारकडून आदर्श शाळा (Adarsh School scheme) बांधण्यात येणार आहेत. यामार्फत आता मार्च महिन्यामध्ये निवडण्यात आलेल्या 488 शाळांसाठी राज्य सरकारकडून तब्बल 494 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलणार विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत.
आदर्श शाळांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक १०० कोटी इतका निधी ई गव्हर्नंसच्या निधीमधून सन २०२०-२१ या वर्षासाठी उपलब्ध नियतव्ययामधून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित रुपये ३९४ कोटी इतका निधी विहित तरतुदीनुसार अर्थसंकल्पामधून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर आदर्श शाळा विकसित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. तसंच सदर शाळांचे बांधकाम समग्र शिक्षा अभियानाच्या यंत्रणेमार्फत करण्यात येईल, अशी माहिती वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी दिली.
आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली आहे.
राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशानं या आदर्श शाळा विकसित करण्यात येतील. आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या दृष्टीनं सुसज्ज भौतिक सुविधांची उपलब्धी, वर्गखोल्या, संगणकीकरण, शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.
हेही वाचा