Advertisement

मुंबई विद्यापीठाला नॅकचं A++ मानांकन

बंगळुरु येथील नॅक मूल्यांकन समितीने मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांना 24, 25 आणि 26 ऑगस्टला भेट दिली होती.

मुंबई विद्यापीठाला नॅकचं  A++ मानांकन
SHARES

मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. नॅककडून अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात आली. मुंबई विद्यापीठाला एकूण ३.६५ गुण मिळाले आहेत. 

बंगळुरु येथील नॅक मूल्यांकन समितीने मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांना 24, 25 आणि 26 ऑगस्टला भेट दिली होती. या भेटीत विद्यापीठाच्यावतीनं शैक्षणिक प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रम, विद्यापीठाची कामगिरी आणि इतर गोष्टींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाला नॅककडून मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठाला A++ असं मानांकन मिळाल्याची माहिती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठाला नॅक मूल्यांकनात ए डबल प्लस अशी श्रेणी मिळालेली आहे. ३.६५ इतका सीजीपीए विद्यापीठाला मिळालेले आहेत. मुंबई विद्यापीठाला महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांपेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत, अशी माहिती प्रदीप सावंत यांनी दिली आहे. 

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाचं कौतुक केलं आहे. सामंत यांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वी झालेल्या नॅक पाहणीमध्ये मुंबई विद्यापीठाला ए-प्लस प्लस नामांकन मिळालेलं आहे. त्याबद्दल मी मुंबई विद्यापीठाचं मनापासून कौतुक करतो आणि शासनाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, ते विद्यापीठाचे कुलगुरु, सर्व अधिकारी, सिनेट सदस्य, मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य या सगळ्यांचं देखील कौतुक करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा