शाळकरी 'पत्रकार'

 BMC office building
शाळकरी 'पत्रकार'
शाळकरी 'पत्रकार'
शाळकरी 'पत्रकार'
शाळकरी 'पत्रकार'
See all

परळ - करीरोड विभागातील ना. म. जोशी मनपा शाळेत शिक्षणाबरोबरच नवे उपक्रम राबवले जात आहेत. या शाळेत सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने इयत्ता सातवी ते नववीतल्या मुलांना पत्रकारितेचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी शाळेत पत्रकारितेसंबंधित प्रदर्शन भरवण्यात आले. यात मुलांनी लिहिलेले लेख, छायाचित्र, रेडिओवर मुलांनी घेतलेली मुलाखत असा प्रवास या प्रदर्शनातून दाखवण्यात आले. यामुळे मुलांच्या ज्ञानात आणि अभ्यासक्रमात भर पडेल असे शाळेचे मुख्याध्यापक चौधरी यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितले. तर हा उपक्रम मुलांच्या दैनंदिन जीवनात फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली.

Loading Comments