Advertisement

वैद्यकीय व दंत पदवी प्रवेशाचं संभाव्य वेळापत्रक!

येत्या १० फेब्रुवारीपासून वैद्यकीय व दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे.

वैद्यकीय व दंत पदवी प्रवेशाचं संभाव्य वेळापत्रक!
SHARES

येत्या १० फेब्रुवारीपासून वैद्यकीय व दंत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश कक्ष (सीईटी सेल)ने याबाबतचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे.


रिक्त जागांवर प्रवेश

सध्या राज्यातील ५७ मेडीकल कॉलेजांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या १ हजार ३४९ शासकीय जागा रिक्त असून, ४२८ खासगी जागा उपलब्ध आहेत. त्याशिवाय दंत पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३८० जागा रिक्त आहेत. सीईटी सेलकडून या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


अंतिम यादी २२ मार्चला

यानुसार येत्या १० फेब्रुवारीपासून या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार असून, २८ फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी व शुल्क भरता येणार आहे. यानंतर ६ मार्चला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. अंतिम यादी २२ मार्चला घोषित करण्यात येईल.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नीट पीजी २०१९ या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तीर्ण उमेदवारांचे गुणवत्ता क्रमांक व उमेदवारांची गुणवत्ता यादी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळेच राज्य सीईटी कक्षाने राज्यातील प्रवेश प्रक्रियेचेही संभाव्य वेळापत्रक तयार केल असून, सरकारची मंजूरी मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.


असं आहे वेळापत्रक

ऑनलाईन नोंदणी व शुल्क : १० ते २८ फेब्रुवारी
प्राथमिक गुणवत्ता यादी : ६ मार्च, सायं. ५ वाजता
कागदपत्रं पडताळणी : नीट एमडीएस - ७ ते १२ मार्च, नीट पीजी - १३ मार्च ते २० मार्च
अंतिम गुणवत्ता यादी : २२ मार्च
पसंतीक्रम नोंदणीपात्र उमेदवार : ७ मार्च ते २० मार्च
पसंतीक्रम बदलण्याची संधी : २१ मार्च ते २७ मार्च
पहिली प्रवेशपात्र यादी : ४ एप्रिल
पहिल्या यादीनुसार प्रवेश : १२ एप्रिलहेही वाचा -

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाची विजयी मोहोर

कर थकवणाऱ्यांवर पालिका करणार कारवाईसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा