Advertisement

वैद्यकीय पदव्युत्तर ऑनलाइन प्रवेशनिश्चिती प्रक्रिया सुरू


वैद्यकीय पदव्युत्तर ऑनलाइन प्रवेशनिश्चिती प्रक्रिया सुरू
SHARES

वैद्यकीय पदव्युत्तरची प्रवेशनिश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रवेशाच्या ऑनलाइन निश्चितीवेळी विद्यार्थ्यांकडून १-२ मूळ कागदपत्रं राहिली किंवा पूर्ण शुल्क भरता आलं नाही तरी शैक्षणिक संस्था संबंधित विद्यार्थ्यांकडून लॉकडाउननंतर संपूर्ण शुल्क भरण्याचं किंवा कागदपत्रे सादर करण्याचे हमीपत्र भरून घेऊ शकतात.

सीईटी सेलकडून विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांच्या माहितीसाठी यासंदर्भातील या पत्रक नुकतंच जारी करण्यात आलं आहे. राज्य कोट्यांतर्गत वैद्यकीय पदव्युत्तर (नीट पीजी) आॅनलाइन प्रवेशनिश्चिती प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिघडलेले आर्थिक गणित तसंच शैक्षणिक कर्जाकरिता बँकेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शुल्काचं १० टक्के आता व उर्वरित लॉकडाउननंतर टप्प्याटप्प्यानं भरायला सांगितलं तर सोयीचे होईल असे पत्र सीईटी आयुक्तांना युवासेनेने पाठविले होते. 

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एमसीए परीक्षेला १८,५५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही सीईटी १९ जुलै रोजी होईल. मास्टर्स आॅफ आर्किटेक्चरच्या सीईटी परीक्षेसाठी १,३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ३१ मेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ आहे. ही परीक्षा १९ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. बॅचलर आॅफ हॉटेल मॅनेजमेंट आणि मास्टर्स आॅफ हॉटेल मॅनेजमेंट या परीक्षाही १९ जुलै रोजी होणे अपेक्षित आहे.



हेही वाचा -

शुक्रवारपासून राज्यात धावणार एसटी

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- जितेंद्र आव्हाड



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा