Advertisement

शुक्रवारपासून राज्यात धावणार एसटी

एसटीची ही सुविधा रेड झोन नसलेल्या जिल्ह्यांतर्गतच सुरू राहणार आहे.

शुक्रवारपासून राज्यात धावणार एसटी
SHARES

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी वाहतुक सुविधा पुरवत आहे. परंत, आता शुक्रवारपासून एसटी अंशत: सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. तसंच, एसटीची ही सुविधा रेड झोन नसलेल्या जिल्ह्यांतर्गतच सुरू राहणार आहे. मुंबई-पुण्यातून पायी निघालेल्या श्रमिकांसाठी आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी एसटी सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई-पुण्यातील हजारो श्रमिक वाहतुकीची सुविधा नसल्यानं पायी चालत आपल्या गावी जात आहेत. आंतरजिल्हा प्रवास मुभा नसल्यानं चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिकांचे हाल कायम आहेत. कोणत्या मार्गावर फेऱ्या चालवणं आवश्यक आहे याबाबत महामंडळाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. या दोन्ही प्रस्तावांवर विचार करून त्यानुसार मर्यादित स्वरूपात गाड्या सोडण्यात येणार आहे.

लाल क्षेत्र नसलेल्या ठिकाणी शुक्रवारपासून धावणाऱ्या एसटी बसमध्ये आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना मुभा असणार आहे. तिकीट काढून सर्वसामान्यांना या बसमधून प्रवास करता येणार आहे. स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच या बस धावणार असल्याचं माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

घाटकोपर, मुलुंड, भांडुपमध्ये चिंता वाढली, रुग्णदुपटीचा कालावधी घटला

'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा