Advertisement

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- जितेंद्र आव्हाड

धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला किंवा त्या संदर्भातील घोषणा करण्यात आली, तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या हिताचं ठरणार आहे.

धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ- जितेंद्र आव्हाड
SHARES

धारावीसारख्या (dharavi) सर्व जाती-धर्माच्या वस्तीचा विकास केल्यास तो विकास महाविकास आघाडी सरकारसाठी (maha vikas aghadi government) सामजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हिताचा ठरेल. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर एक बैठक आयोजित करून धारावी पुनर्विकास प्रकल्प (dharavi redevelopment project) लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारं पत्र राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना गुरूवार २१ मे २०२० रोजी पाठवलं आहे.

हेही वाचा - हा देश ड्रामा करणाऱ्यांचाच, जितेंद्र आव्हाडांचा सीतारमण यांना टोला

नकारात्मक प्रतिमा

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात जितेंद्र आव्हाड (housing minister jitendra awhad) यांनी नमूद केलं आहे की, मुंबईची कोविड १९ कॅपिटल (coronavirus) म्हणून धारावीची ओळख प्रस्थापित होऊ लागली आहे. कोरोनामुळे जी स्थित्यंतरे पाहायला मिळाली आहेत, त्यातील प्रमुख स्थित्यंतरे ही झोपडपट्टी (slum) भागात दिसून आली. धारावीसारख्या झोपडपट्टीत कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे येथील उपचार यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडलेली दिसली. परिणामी सर्वसामान्यांमध्ये धारावीविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर सामार्थिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

राजकीय विरोधकांना दणका

धारावीच्या पुनर्विकासाची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. केंद्रापासून राज्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडलेल्या आहेत. आजच्या स्थितीत कोरोनामुळे मुंबईचं अर्थकारण घसरलेलं आहे. अशा स्थितीमध्ये धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला किंवा त्या संदर्भातील घोषणा करण्यात आली, तर महाविकास आघाडीच्या दृष्टीने ते राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या हिताचं ठरणार आहे. शिवाय आपल्या राजकीय विरोधकांना सोशल इम्पॅक्टचा मोठा दणका आपल्याला देणं शक्य होणार आहे. बांधकाम उद्योग हा असा उद्योग आहे की ज्याच्यामध्ये कितीही घसरण झाली तरी बाहेरच्या विश्वातून निधी येतो. त्यामुळे ढासळलेला आर्थिक-सामाजिक स्तर उंचावतानाच नवीन रोजगार निर्मिती देखील करता येईल, असं आव्हाड यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

हेही वाचा - माझा मेडिकल रिपोर्ट ‘यांनी’ लपवला- जितेंद्र आव्हाड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा