Advertisement

माझा मेडिकल रिपोर्ट ‘यांनी’ लपवला- जितेंद्र आव्हाड

मी कोरोनाबाधित झाल्याची माहिती कळल्यामुळे माझ्या कुटुंबियांना खूप त्रास झाला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच माझ्या मेडिकल रिपोर्टबाबत (medical report) गुप्तता पाळण्यात आली होती.

माझा मेडिकल रिपोर्ट ‘यांनी’ लपवला- जितेंद्र आव्हाड
SHARES

मी कोरोनाबाधित झाल्याची माहिती कळल्यामुळे माझ्या कुटुंबियांना खूप त्रास झाला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच माझ्या मेडिकल रिपोर्टबाबत (medical report) गुप्तता पाळण्यात आली होती, असा खुलासा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केला. कोरोनावर यशस्वी मात करून जितेंद्र आव्हाड नुकतेच घरी परतले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आव्हाड यांनी आपला अनुभव कथन केला.

हलगर्जीपणाचा फटका

यासंदर्भात जितेंद्र आव्हाड म्हणाले, कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव आणि लाॅकडाऊनमुळे (lockdown) अडचणीत आलेल्या माझ्या मतदारसंघातील नागरिकांना मदत करण्यासाठी मी दिवस-रात्रीची तमा न बाळगता झपाटून काम करत होतो. अन्नधान, इतर मदत सामुग्रीचं वाटप करण्यासाठी लोकांच्या गर्दीत मिसळणं, तोंडाला मास्क लावलं आहे की नाही, याची दक्षता न घेणं, सुरक्षेसंदर्भातील प्रोटोकाॅल न पाळणं यांत झालेल्या हलगर्जीपणाचा मला फटका बसला. माझी पहिली टेस्ट निगेटिव्ह आल्याने मी निश्चिंत होतो, त्याच वेळी मी सावध झालो असतो, तर शरीराला एवढा त्रास नसता झाला. कदाचित अद्दल घडवी म्हणूनच कोरोनाची मला लागण झाली असावी.

हेही वाचा - मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ- जितेंद्र आव्हाड

जगण्याची शक्यता

त्यानंतर मी रुग्णालयात कसा पोहोचलो आणि तिथे पुढचे काही दिवस माझ्यावर कसे उपचार करण्यात आले हे माझ्या लक्षात नाही. कारण माझ्या मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे असेल कदाचित पण मला त्यावेळचं काही आठवत नाही. मला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं, हे मात्र खरं. त्यानंतर माझी जगण्याची शक्यता केवळ ३० टक्केच असल्याचं जेव्हा माझ्या मुलीला सांगण्यात आलं, तेव्हा ती हादरली. पण हळुहळू तिने परिस्थितीशी जुळवून घेतलं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

तेव्हा कळालं

माझ्यासोबतच माझी पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याने माझ्या प्रकृतीविषयी फारशी माहिती तिला देण्यात येत नव्हती. परंतु कुटुंबियांनाही त्रास होऊ नये म्हणून घरच्यांना फार माहिती न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी घेतला होता. उपचारांच्या पहिल्या टप्प्यानंतर मी सावरलो. माझ्यासाठी येणाऱ्या जेवणाच्या ताटावर माझ्या नावासोबत जेव्हा मी कोविड-१९ असं वाचलं, तेव्हा मला कळालं की मला कोरोना झाला आहे. तोपर्यंत मला कशाचीच कल्पना नव्हती, असा अनुभव आव्हाड यांनी सांगितला.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा