Advertisement

MH TCET परीक्षांच्या तारखा जाहीर

सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

MH TCET परीक्षांच्या तारखा जाहीर
SHARES

एमएचटी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. एमएचटी सीईटी परीक्षा जुलै महिन्यात घेतली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी घेतली जाणारी एमएचटी सीईटी परीक्षा होणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं. प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी यासंदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती ही संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या ४, ६ , ७, ८, ९, १०, १३, १४ , २८ , २९, ३०, ३१ या तारखांना एमएचटी सीईटीच्या परीक्षा होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ ऑगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळणार आहे.

सीईटीच्या नियमांप्रमाणे पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा या वेगवेगळ्या होणार आहेत. परीक्षा ज्या केंद्रावर होतील त्या केंद्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत परीक्षांच्या तारखांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. 

अर्ज भरण्यास मुदतवाढ

अभ्यासक्रम
 अर्जसंख्या 
अर्ज भरण्याची मुदत 
सीईटी परीक्षेची प्रस्तावित तारीख
बीएड 
३६५७३
३० मे 
१५/१६ जुलै
एलएलबी ३ वर्ष
२८,६१५
३० मे 
६ ऑगस्ट
एमएड
१४९६
३० मे  
२४ जुलै
बीएबीएड /बीएससीबीएड(इंटिग्रेटेड)
१९३३
३० मे
२४ जुलै 
बीएड /एमएड (इंटिग्रेटेड)
१४७६
३० मे
१९ जुलै 
एमपीएड
१६३७
३० मे
२४ जुलै 
बीपीएड
५९७०
३० मे
२४ जुलै 
एलएलबी ५ वर्षे (इंटिग्रेटेड)
२२३९८
मुदतवाढ नाही
२४ जुलै 



हेही वाचा -

Coronavirus Updates: ३ लाखाहून अधिक धारावीकरांची तपासणी

निवासी डॉक्टरांना आठवड्यातील ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा