Advertisement

म्हणून विद्यार्थी ताटकळले ...!


म्हणून विद्यार्थी ताटकळले ...!
SHARES

आतापर्यंत फक्त शिक्षकांनाच अशैक्षणिक कामांसाठी जुंपलं जाते, अशी ओरड ऐकायला मिळत होती. मात्र आता विद्यार्थ्यांनाही ते करावं लागतं. याचे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले.

खरेतर बेस्टच्या 'निलांबरी' बसमधून मिसवर्ल्ड मानुषी छिल्लरसाठी शनिवारी छोटेखानी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांचं बँड आणि लेझीम पथक तैनात करण्यात आलं होतं. मात्र या कार्यक्रमासाठी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना खूप वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं.


कार्यक्रमाला उशीर, विद्यार्थी ताटकळले 

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हीच्याशी शनिवारी मुंबईत प्रभादेवी इथल्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमाआधी निलांबरीमधून मिरवणूक निघाली. पण नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाल्याने पालिका विद्यार्थ्यांसमोर वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.


विद्यार्थ्यांना गृहीत धरण्याचा प्रकार

कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि शिक्षक वेळेवर आल्यानंतरही प्रमुख पाहुणे आणि लोकप्रतिनिधी उशिरा आल्याने कार्यक्रमही उशिरा सुरू झाला. त्यामुळे पालिका विद्यार्थी आणि शिक्षकांना ताटकळत ठेवून त्यांना गृहीत धरले जात आहे का? अशी विचारणा काही पालिका शिक्षकांकडून होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा