Advertisement

एमपीएससी परीक्षा देण्याच्या संख्येवर आता मर्यादा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एमपीएससी आता यूपीएससीचा पॅटर्न राबवणार आहे.

एमपीएससी परीक्षा देण्याच्या संख्येवर आता मर्यादा
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.  एमपीएससी आता यूपीएससीचा पॅटर्न राबवणार आहे. एमपीएससीने  परीक्षा देण्याच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यानुसार आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असणार आहेत. 

एमपीएससीने आपल्या पत्रकात म्हटले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारसी संदर्भात राबवण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियांमध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/संधीची संख्या मर्यादित करणे, या संदर्भात खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे. 

नवीन नियम

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना किमान सहा संधी उपलब्ध असतील.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.
  • उर्वरीत मागास प्रवर्गातील उमेदवारांना किमान नऊ संधी उपलब्ध असतील.
  • उमेदवारांनी पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संधी मानली जाईल.
  • एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरला उपस्थित राहिल्यास ती संधी मानली जाईल.
  • उमेदवार कोणत्याही कारणास्तव परिक्षेला गैरहजर राहिला तरी ती संधी मानली जाईल.
  • हा निर्णय २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षांबाबतच्या जाहिरातींना लागू होईल.



हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा