Advertisement

MPSC परीक्षा 'या' तारखेला होणार

याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे.

MPSC परीक्षा 'या' तारखेला होणार
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra State Public Service Commission) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे. महाराष्ट्रा लोकसेवा आयोगामार्फत २ जानेवारी २०२२ रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा २३ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

तसंच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांसाठी देखील काही महत्त्वपूर्ण सूचना या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आल्या आहेत. सोबत परीक्षेचे प्रवेशपत्र देखील जाहीर करण्यात आले आहेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती.

आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा आता रविवार दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. रविवारी दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित परीक्षेकरीता आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रांमध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

पत्रकात हे देखील म्हटलं आहे की, कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवरील उमेदवाराच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे.

परीक्षा कक्षेत प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणत्रत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याच्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेश पत्र मिळण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास तातडीनं आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधावा.



हेही वाचा

मुंबई महापालिकेचा 'या' विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा