Advertisement

विद्यार्थ्यांना आता एका दिवसातच मिळणार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी

विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता.

विद्यार्थ्यांना आता एका दिवसातच मिळणार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी
SHARES

मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत एका दिवसात देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याच्या ईमेलवर त्याच्या विषयाची स्कॅन केलेली उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठविली जात आहे.

याची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता, तो आता मिटला आहे. 

विशेष म्हणजे आजपर्यंत मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना पाठविलेल्या आहेत. 2023 च्या उन्हाळी सत्रापर्यंत पुनर्मूल्यांकनाचे अर्ज आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविले जात होते. पण अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करून त्याला त्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठविली जात होती. त्यामुळे या प्रक्रियेला विलंब लागत होता. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाच्या अर्जावरही विलंबानेच कार्यवाही होत होती.

यामुळे आता यावर विद्यापीठाने एक युक्ती शोधून काढली आहे. मुंबई विद्यापीठाने एक नवी संगणक प्रणाली विकसित केली. 2023 च्या हिवाळी सत्राच्या निकालापासून सदर प्रणाली विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे एखाद्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फॉटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची एक लिंक उपलब्ध करून दिली आहे.


हेही वाचा

SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांना 'या' तारखेपासून मिळणार हॉल तिकीट

SSC, HSCचे प्रात्यक्षिक गुण ऑनलाइन अपलोड होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा