Advertisement

तासगावकर काॅलेजवर कारवाई काय? मुक्ता संघटनेचा सवाल


तासगावकर काॅलेजवर कारवाई काय? मुक्ता संघटनेचा सवाल
SHARES

कर्जतच्या तासगावकर इंजिनीअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जुना पेपर दिल्याचा प्रकार घडल्यावर कॉलेजवर काय कारवाई केली गेली? असा सवाल करत विद्यापीठाचे अधिकारी आणि कॉलेज प्रशासन यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप मुक्ता संघटनेचे अध्यक्ष वैभव नरवाडे यांनी केला आहे.


काय आहे प्रकरण?

तासगावकर कॉलेजच्या सिव्हिल शाखेच्या विद्यार्थ्यांचा दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स विषयाचा केटीचा पेपर होता. यावेळी विद्यार्थ्यांना जुनाच पेपर देण्यात आला. तब्ब्ल २ तासांनी ही गोष्ट काॅलेजच्या लक्षात आली. मात्र तोपर्यंत काही विद्यार्थी पेपर देऊन निघूनही गेले होते.


प्रचंड मनस्ताप

या विद्यार्थ्यांना अखेर फोन करून बोलावून घेण्यात आलं. त्यांना नवीन पेपर देऊन पुन्हा परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आलं. कॉलेजच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा तीन तास बसून रात्रीपर्यंत पेपर लिहावा लागला. या गंभीर चुकीवर मुंबई विद्यापीठ कॉलेजवर काय कारवाई करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

संबंधित कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या गैरकारभारविरोधात विद्यापीठाकडे अनेकवेळा तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. त्यावरून मुंबई विद्यापीठ कॉलेज प्रशासनाला पाठीशी घालत आहे, असं वैभव नरवाडे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा