Advertisement

मुंबईतील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार नाहीत, 'हे' आहे कारण

राज्यातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने ३ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला.

मुंबईतील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार नाहीत, 'हे' आहे कारण
SHARES

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. मात्र मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील महाविद्यालये बंदच राहणार आहेत. कोरोना स्थितीच्या आढाव्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील विद्यापीठे त्याअंतर्गत येणारी महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याबाबत राज्य सरकारने ३ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. तरीसुद्धा मुंबईतील महाविद्यालये उद्यापासून सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली आहे

महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन २२ फेब्रुवारीपर्यत विचार होणार आहे. मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून २२ फेब्रुवारीपर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना देऊ आणि त्यानंतर मुंबईतील महाविद्यालये कधी सुरु करता येतील यावर निर्णय घेऊ असं सांगण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वसई-विरार, पनवेल, पालघर या क्षेत्रात महाविद्यालय सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर या भागातील महाविद्यालय राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचा पालन करत सुरू होणार आहेत. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील स्थानिक प्रशासनाने अद्याप महाविद्यालय सुरू करण्याबाबत कळवलेलं नाही.



हेही वाचा -

मुंबईत १८०० किलो गांजा जप्त

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस अंधेरी रेल्वे स्थानकातही थांबणार



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा