मुंबईत १८०० किलो गांजा जप्त

काही लोक गांजा मुंबईत पोहोचवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मिळाली होती. यानंतर घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवला.

मुंबईत १८०० किलो गांजा जप्त
SHARES

मुंबईत तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा १८०० किलो गांजा शुक्रवारी  जप्त करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाने आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे ड्रग्स तस्करांचं मोठं रॅकेट उघड झालं आहे. 

काही लोक गांजा मुंबईत पोहोचवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मिळाली होती. यानंतर घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एक ट्रक अडवला. त्यात नारळ भरले होते. आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवून त्यात गांजा लपवला होता. यावेळी १८०० किलो गांजा जप्त केला. या गांजाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. पोलिसांनी आकाश यादव, दिनेशकुमार सरोज यांना अटक केली. तर मुख्य आरोपी संदिप सातपुते फरार झाला आहे.

या तस्करीचे संबंध ओडिशा- छत्तीसगड भागातील नक्षलवाद्यांची असल्याचा संशय मुंबईचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला आहे. हा गांजा ओडिसा राज्यातून आणण्यात आला होता. ओडिसा-छत्तीसगड सीमेवरील नक्षलवादी भागातून हा गांजा मुंबईत दरमहा ५ टन आणला जात असे. तेथून गांजा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूर येथे विकला जात असे. 

ओडिसामधून आणून हा गांजा भिवंडी येथील एका गोदामात ठेवला जात असे. या तस्करीतील प्रमुख सूत्रधार संदीप सातपुते याच्याच मालकीचे हे गोदाम आहे. ओडिसा तील तस्कर लक्ष्मी प्रधान हा  गांजा संदीप सातपुते याच्याकडे पाठवायचा. हा गांजा प्रथम आंध्रप्रदेश येथे ठेवला जायचा. नंतर तो सोलापूर, पुणे आणि मुंबईत आणला जायचा. 

लक्ष्मी प्रधान १ किलो गांजासाठी जवळपास ८००० रुपये खर्च करत होत. तो सातपुते सारख्या सप्लायरला जवळपास १२ ते १५ हजार रुपयांत गांजा विकत होता. मग हे लोक ड्रग्ज बाजारात सुमारे २० हजार रुपये प्रति किलोने गांजा



हेही वाचा -

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस अंधेरी रेल्वे स्थानकातही थांबणार

मुंबईतील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार नाहीत, 'हे' आहे कारण



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा