Advertisement

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस अंधेरी रेल्वे स्थानकातही थांबणार

अंधेरी स्थानकात तेजस एक्सप्रेसला थांबा देण्यासोबतच बोरिवली स्थानकात या ट्रेनच्या येण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस अंधेरी रेल्वे स्थानकातही थांबणार
SHARES

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस आता अंधेरी स्थानकातही थांबणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून, २९ फेब्रुवारीपर्यंतच हा निर्णय लागू असं असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

अंधेरी स्थानकात तेजस एक्सप्रेसला थांबा देण्यासोबतच बोरिवली स्थानकात या ट्रेनच्या येण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. मुंबईहून अहमदाबादला जात असताना  तेजस एक्सप्रेस मुंबई सेंट्रलवरून दुपारी ३.४५ ऐवजी ३.५० वाजता सुटणार आहे. बोरिवलीला ही ट्रेन दुपारी ४.१५ ऐवजी दुपारी ४.१३ वाजता पोहोचणार आहे. बोरिवली स्थानकात या ट्रेनला २ मिनिटांचा थांबा असणार आहे.

अहमदाबादवरून परत येत असताना ही ट्रेन बोरिवलीला दुपारी १२.१२ वाजता पोहचेल आणि १२.१३ दुपारी वाजता मुंबई सेंट्रलच्या दिशेने रवाना होईल. मुंबईहून अहमदाबादला जात असताना ही ट्रेन अंधेरी स्थानकात दुपारी ३.५६ वाजता पोहोचेल आणि दुपारी ३.५८ मिनिटांनी अहमदाबादकडे रवाना होईल. अहमदाबादवरून मुंबईकडे येत असताना ही ट्रेन अंधेरी स्थानकात दुपारी १२.२८ मिनिटांनी पोहोचेल आणि १२.३० मिनिटांनी मुंबई सेंट्रलच्या दिशेने रवाना होईल.



हेही वाचा -

मुंबईतील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार नाहीत, 'हे' आहे कारण

मुंबईत १८०० किलो गांजा जप्त




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा