Advertisement

मुंबईतही दोन शाळांकडे सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र

लवकरच मुंबईतल्या त्या दोन शाळांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईतही दोन शाळांकडे सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र
SHARES

मुंबईतल्या दोन शाळांनीही सीबीएसईचे (CBSE) बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचं चौकशीत उघडकीस आलं आहे. या दोन्ही शाळांची माहिती पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांकडून मंत्रालयातील शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईतल्या त्या दोन शाळांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

पुण्यातील तीन शाळांनी सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र (CBSE Certificate Scam) मिळवल्याचं नुकतंच उघडकीस आलं होतं. त्यानंतर मंत्रालयातून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पुणे उपसंचालकांना देण्यात आले होते. शिक्षण उपसंचालकांकडून चौकशीची ही जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी के. डी. भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

चौकशीत पुण्यातील तीन शाळांशिवाय मुंबईतील दोन शाळांच्या नावंही सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे.

पुण्यातील तीन शाळांच्या नावे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचं उघडकीस आल्यानंतर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण उपसंचलक विभागाने चौकशी सुरु केल्यानंर पुण्यातील तीन शाळांबरोबरच पुणे जिल्ह्यातील आणखी बारा शाळांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र देणारं रॅकेट कार्यरत असून 666 शाळा प्रमाणपत्र घेतल्याचा संशय आहे.



हेही वाचा

CBSE 2023: 10वी - 12वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, सवलतीच्या गुणांसाठी मोजा 'इतके' शुल्क

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा