Advertisement

निकाल जाहीर न करताच एटीकेटीची परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा गोंधळ सुरूच

मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान घेतलेल्या तिसऱ्या सत्राच्या बँकिंग इन अकाऊंट अॅण्ड फायनान्स (BAF) या परीक्षेचे निकाल जाहीर न करताच विद्यापीठाने एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक घोषित केल्याने विद्यार्थ्यांच्या त्रासात भर पडली आहे.

निकाल जाहीर न करताच एटीकेटीची परीक्षा, मुंबई विद्यापीठाचा गोंधळ सुरूच
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या घोटाळ्यांची मलिका अद्यापही सुरु असल्याचं दिसत आहे. मुंबई विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान घेतलेल्या तिसऱ्या सत्राच्या बँकिंग इन अकाऊंट अॅण्ड फायनान्स (BAF) या परीक्षेचे निकाल जाहीर न करताच विद्यापीठाने एटीकेटी परीक्षेचं वेळापत्रक घोषित केल्याने विद्यार्थ्यांच्या त्रासात भर पडली आहे.


नेमकं प्रकरण काय?

बँकिंग इन अकाऊंट अॅण्ड फायनान्स (BAF) च्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची सेमिस्टर ५ ची परीक्षा १० नोव्हेंबर २०१७ ला घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल जाहीर न करताच विद्यापीठाने १० एप्रिल २०१८ ला एटीकेटीची परीक्षा ठेवली. हा गोंधळ कमी की काय १९ एप्रिलपासून सेमिस्टर ६ ची परीक्षाही घोषित केली. निकाल लागलेले नसताना एटीकेटीची परीक्षा कशी द्यायची? असा प्रश्न विचारत विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे चौकशी केल्यावर त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.


निकाल लावण्यात असक्षम

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून घातलेला परीक्षा व निकालांचा गोंधळ अद्याप मिटलेला नाही. प्रत्येक वेळी मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावत आहे. मुंबई विद्यापीठ कोणतंही काम सक्षम पद्धतीने हाताळण्यास सिद्ध नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे.
- गणेश सुतार, विद्यार्थी, बीएएफ


नियम काय सांगतो?

मुंबई विद्यापीठाने परीक्षा घेतल्यानंतर ४५ ते ५० दिवसांच्या आत निकाल लावणं अपेक्षित असतं. परंतु परीक्षा होऊन ५ महिने उलटले तरी देखील निकाल जाहीर झालेले नाहीत. तसंच ''काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने एक परिपत्रक काढून तब्बल ३० परीक्षा पुढे ढकलल्याने आमच्या उन्हाळी सुट्ट्यांचं प्लानिंग वाया जाणार आहे. त्यातच सेमिस्टर ६ ची परीक्षा एवढ्या उशीरा घेतली तर या परीक्षेचा निकाल कधी लावणार? हे निकाल वेळेवर लागले नाहीत, तर आमच्या उच्चशिक्षणाचा मार्गही बंद होणार,'' अशी प्रतिक्रिया निर्मला काॅलेजचा विद्यार्थी आदित्य झा याने दिली.


वरीष्ठ गेले सुट्टीवर

या संदर्भात मुंबई विद्यापीठाकडे आम्ही चौकशी करण्यास गेलो असता, त्यांनी आमच्याशी असभ्यपणे वर्तन केलं. आम्ही या प्रकरणाबाबत काहीही करू शकत नाही, तुम्ही याबाबत वरिष्ठांना विचारा, असंही सांगण्यात आलं. वरिष्ठांबाबत विचारणा केली असता ते सुट्टीवर गेल्याचं कारण आम्हाला देण्यात आलं.
- अनिष कंठारिया, विद्यार्थी, बीएएफ

या संदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांच्याशी मुंबई लाइव्हने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.



हेही वाचा-

मुंबई विद्यापीठाचा नवा कारनामा, ३० परीक्षा तब्बल महिनाभर पुढे ढकलल्या!

टीवाय बीकॉमचा पेपरही फुटला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा