Advertisement

परीक्षा गोंधळानंतर आता विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ!

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शनिवारी ७ एप्रिलला ३० परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे केली होती. दरम्यान, या परीक्षा पुढे ढकलल्याने एसवायबीकॉमची आणि सीएची परीक्षा ३ मे या एकाच दिवशी होत आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका शाखेची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येत आहे.

परीक्षा गोंधळानंतर आता विद्यापीठाचा वेळापत्रक गोंधळ!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शनिवारी ७ एप्रिलला ३० परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे केली होती. दरम्यान, या परीक्षा पुढे ढकलल्याने एसवायबीकॉमची आणि सीएची परीक्षा ३ मे या एकाच दिवशी होत आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका शाखेची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांद्वारे करण्यात येत आहे. 

याशिवाय, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत असून या संबंधित काही विद्यार्थ्यांनी सह्यांचे पत्र मंगळवारी विद्यापीठात दिले आहे. त्यामुळे एकंदरीतच विद्यापीठात निकाल गोंधळानंतर परीक्षा वेळापत्रक गोंधळ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

'सात दिवसांत प्रलंबित निकाल जाहीर करा'

दरम्यान, या वेळापत्रक गोंधळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्र. कुलगुरू डॉ. विष्णु मगरे यांची मंगळवारी भेट घेतली. या संघटनेने येत्या सात दिवसांत प्रलंबित निकाल जाहीर करण्याची मागणी विद्यापीठाला केली आहे. तसेच, एसवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांची परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी संघटनेद्वारे करण्यात आली आहे.

निकाल गोंधळानंतर वेळापत्रक गोंधळ!

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना निकाल गोंधळामुळे बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. दरम्यान, या गोंधळाचा फटका अद्यापही अनेक निकाल व परीक्षांवर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, विद्यापीठाने दिलेल्या नवीन परीक्षांच्या वेळापत्रकातल्या वेळांबाबत अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, हे नवीन वेळापत्रक विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता बनवल्याची टीका विद्यार्थी संघटनेकडून केली जात आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या मागण्यांबाबत परीक्षा विभाग काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

मुंबई विद्यापीठाच्या दर्जाची मुख्यंमत्र्यांना काळजी!

मुंबई विद्यापीठ टाॅप १०० च्या यादीबाहेर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा