Advertisement

अखेर विद्यापीठानं एमएससी परीक्षेचं वेळापत्रक बदललं!


अखेर विद्यापीठानं एमएससी परीक्षेचं वेळापत्रक बदललं!
SHARES

अभ्यासक्रम पूर्ण होण्यापूर्वीच परीक्षा विभागानं एमएससीच्या पहिल्या सत्रांच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. विद्यार्थी अाणि विद्यार्थी संघटनांनी जोरदार अाक्षेप घेतल्यानंतर अखेर विद्यापीठानं माघार घेत परीक्षेचं वेळापत्रक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला अाहे. २७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एमएससीच्या परीक्षा अाता २३ जानेवारीपासून सुरू होतील. या संदर्भातील सूचना विद्यापीठाकडून संलग्न महाविद्यालयांना देण्यात अाल्या अाहेत.


मुंबई विद्यापीठाच्या अाॅनलाइन निकालांच्या घोळामुळे अनेक अभ्यासक्रमांच्या निकालासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागली होती. त्यामुळे एमएससीची प्रवेश प्रक्रियाही लांबली होती. अनेक महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश नोव्हेंबरपर्यंत पूर्ण झाले नव्हते. अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नसतानाच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात अाल्यामुळे विद्यार्थी अाणि विद्यार्थी संघटनांनी त्यास विरोध केला. अखेर मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकललं अाहे.

संबंधित विषय