Advertisement

अभ्यासक्रम पूर्ण नसतानाच परीक्षांचा घाट, विद्यापीठाचा नवा गोंधळ

एम.कॉम. आणि एम.ए.ची प्रवेशप्रक्रिया महिन्याभरापूर्वीच संपली असताना पुन्हा नवीन परीक्षांचा घाट घातल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांनी मुंबई विद्यापीठाचा निषेध केला आहे.

अभ्यासक्रम पूर्ण नसतानाच परीक्षांचा घाट, विद्यापीठाचा नवा गोंधळ
SHARES

एम.कॉम. आणि एम.ए. परीक्षांच्या निमित्ताने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा कित्ता पुन्हा गिरवला आहे. एम.कॉम. आणि एम.ए.ची प्रवेशप्रक्रिया महिन्याभरापूर्वीच संपली असून अद्याप अभ्यासक्रमही शिकवून झालेला नाही. असं असताना विद्यापीठाने परीक्षांचा घाट घातला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांनी विद्यापीठाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निकालाच्या गोंधळाला सामोरे जावं लागलं. त्याचा थेट परिणाम विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाना बसला असून अनेक ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागली आहे.


परीक्षा विभागाला विसर

नवीन सत्र सुरू होऊन एकूण ९० दिवसांच्या शिकवणीच्या नियमांच पूर्तता झालेली नाही. अद्याप अनेक अभ्यासक्रम पूर्णपणे शिकवून झालेले नसताना परीक्षा विभागानं डिसेंबरमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा जाहीर केली आहे. त्यामुळे यापूर्वी एम.एससी.च्या काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर परीक्षा विभागाने फक्त या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केले. मात्र एम.कॉम. आणि एम.ए.च्या वेळापत्रकाबाबत परीक्षा विभागाला विसर पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेत या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.


यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेतली आहे. एम.कॉम. आणि एम.ए.च्या परीक्षेबाबत लवकरच अधिष्ठातांची बैठक बोलवून निर्णय घेण्याचं आश्वासन डॉ. शिंदे यांनी दिलं आहे.
-सुधाकर तांबोळी, मनविसे


हेही वाचा - 

विद्यापीठात नवी टीम, आता तरी निकाल लागणार का?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा