Advertisement

विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनातून कमावले ४ कोटी ८३ लाख, निकाल अजूनही प्रलंबित


विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनातून कमावले ४ कोटी ८३ लाख, निकाल अजूनही प्रलंबित
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकनामुळे निकालाचा गोंधळ उडाल्यानेच यंदा पुनर्मूल्यांकनासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले. या अर्जांपोटी विद्यापीठाच्या तिजोरीत तब्बल ४ कोटी ८३ लाख रुपयांची भर पडल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. तर फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांनी १५ लाख ३२ हजार ५५ रुपये मोजले असल्याचंही यानिमित्ताने समोर आलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पुनर्मूल्यांकनासाठीचे शुल्क कमी केल्याने गोळा झालेली रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं समोर आलं आहे.


कोट्यवधी रुपये जमा

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पुर्नमूल्यांकन आणि फोटोकॉपीतून किती रक्कम जमा झाली यासंदर्भात विहार दुर्गे यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागविली होती. त्यावेळी वरील माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फेरतपासणीचे शुल्क कमी करूनही कोट्यवधी रुपये जमा झाल्याचं उघडकीस आलं आहे.


पुनर्मूल्यांकनातून ४ कोटी

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल दरवर्षी जून-जुलैमध्ये जाहीर होतात. पण हे निकाल यावर्षी नोव्हेंबरपर्यंत लटकले. यातील शेकडो विद्यार्थ्यांना अजूनही पुनर्मूल्यांकनाचे निकाल मिळालेले नाहीत. विशेष म्हणजे जाहीर केलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये निकालातील चुकांमुळे पुनर्मूल्यांकनासाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. 

या पार्श्वभूमीवर दुर्वे यांनी विचारलेल्या माहितीवर उत्तर देताना विद्यापीठ प्रशासनाने २०१६-१७ वर्षात पुनर्मूल्यांकनाचे ४ कोटी ८३ लाख ३०४९० रुपये तर फोटोकॉपीचे २० लाख ९३,८२५ रुपये शुल्क जमा झाल्याचं सांगितलं. तर २०१५-१६मध्ये पुनर्मूल्यांकनाचे ५ कोटी २८ लाख ७८,०४० रुपयांचे शुल्क जमा झाल्याची माहिती देण्यात आली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा