Advertisement

अहो, आता तरी निकाल वेळेत लागतील का?


अहो, आता तरी निकाल वेळेत लागतील का?
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमध्ये उडालेल्या गोंधळानंतर आता हिवाळी परीक्षेच्या निकाल गोंधळास सुरूवात झाली आहे. मात्र, यावेळी या अभ्यासक्रमांचे निकाल लवकरच जाहीर करण्याचे सूतोवाच परीक्षा विभागाने दिले आहेत. यासंदर्भात शनिवारी मुंबई विद्यापीठात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका तपासून झाल्या असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.


निकालांचे काम अंतिम टप्प्यात

या बैठकीत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते. डॉ. घाटुळे यांनी याप्रकरणी आढावा घेतला असून या अभ्यासक्रमांच्या सर्व उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. सध्या निकालांचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. घाटुळे यांनी दिली.


७० दिवसांनंतरही एमएसडब्ल्यूचा निकाल नाही

निकालाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना आधीच बसला आहे. त्यामुळे हिवाळी परीक्षेदरम्यान हा मनस्ताप होऊ नये, म्हणून ४५ दिवसांच्या आत परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची सूचना राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही विद्यापीठाला हिवाळी सत्र परीक्षेतील एमएसडब्लू या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन ७० दिवस उलटले, तरी निकाल जाहीर करण्यात अपयश आले होते.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा