अभियांत्रिकी शाखेचा प्रथम वर्ष सत्र १ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या प्रथम वर्ष बीई सत्र १ चा निकाल जाहीर केला आहे. या निकालाची टक्केवारी ३९ टक्के इतकी आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये घेतलेल्या प्रथम वर्ष बीई सत्र १ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत २३ हजार ३६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील २२ हजार ९६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील फक्त ८ हजार ९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या निकालाची टक्केवारी ३९ टक्के इतकी आहे. दरम्यानं मंगळवारी ६ एकूण  निकाल जाहीर करण्यात आले असून आतापर्यंत २६४ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


१,११,२१८ उत्तरपत्रिका १,१६२ शिक्षक 

मुंबई विद्यापीठाकडे प्रथम वर्ष बीईच्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी १ लाख ११ हजार २१८ उत्तरपत्रिका दाखल झाल्या होत्या. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी १ हजार १६२ शिक्षकांद्वारे करण्यात आली असून एकूण ३० हजार ६६५ उत्तरपत्रिकांचं माॅडरेशन करण्यात आलं आहे. 


६ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बीई सत्र १ बरोबरच विविध परीक्षांचे ५ निकाल जाहीर केले आहेत. यात एमएससी (फाॅरेन्सिक सायन्स) सत्र १, एमएससी (फोरेन्सिक सायन्स) सत्र ३, एमसीए सत्र ३(Credit Based semester grading system), एमसीए सत्र ३(Choice Base), एम.एच.आर.डी.एम. तृतीय वर्ष सत्र २  या ६ परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे. दरम्यान बीई व्यतिरिक्त इतर ३ परीक्षांमध्ये ९०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात ५६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


विधी शाखेचेही निकाल लवकरच

दरम्यान तीन वर्षीय विधी शाखेचे सत्र ५ च्या परीक्षेचे मुल्यांकन सुरु असून या परीक्षेचे ८०% मुल्यांकन पूर्ण झालेले आहे. उर्वरित मुल्यांकन लवकर करण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना याबाबत निर्देश दिलेले आहेत. यानुसार विधी शाखेचे शिक्षक मुल्यांकन करत असून लवकरच हा निकाल जाहीर करण्यात येईल. हेही वाचा -

आता मुंबईहून थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा

प्रवाशांना बिस्किटातून गुंगीचं औषध देऊन लूट; दोघांना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या