Advertisement

आता मुंबईहून थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा

लवकरच मुंबई ते प्रयागराज असा विमानप्रवास करणं शक्य होणार आहे. येत्या महिन्यापासून मुंबई ते थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला आहे.

आता मुंबईहून थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा
SHARES

लवकरच मुंबई ते प्रयागराज असा विमानप्रवास करणं शक्य होणार आहे. येत्या महिन्यापासून मुंबई ते थेट प्रयागराजपर्यंत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला आहे.

बुकींग सुरू

२० एप्रिल पासून बमरोली एअरपोर्ट ते मुंबई एअरपोर्ट अशी थेट विमानसेवा सुरू करण्यात होणार आहे. यासाठी आता बुकींग प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. इंडिगो एअरलाईन्सकडून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. 

सातही दिवस सेवा

ही विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. मुंबई एअरपोर्टवरून सकाळी ११.१५ वाजता हे विमान उडेल आणि दुपारी १.३० वाजता हे विमान बमरोली एअरपोर्टवर पोहोचेल. तसंच दुपारी २ वाजता हे विमान बमरोलीहून निघून संध्याकाळी ४ वाजता मुंबईत पोहोचेल. मुंबईहून प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांना प्रती प्रवासी ४ हजार २९९ रूपये तर प्रयागराजहून मुंबईला येण्यासाठी ३ हजार ७४८ रूपये मोजावे लागणार आहेत. 
हेही वाचा -

प्रवाशांना बिस्किटातून गुंगीचं औषध देऊन लूट; दोघांना अटक

आता पोलिस ठाण्यातही भरणार जनता दरबार
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा