Advertisement

'आयडॉल'च्या पहिल्याच पेपरला 'लेटमार्क'

विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळपासून वेबसाइटवर हाॅल तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असता विद्यापीठाची वेबसाईटच बंद पडली. यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेदरम्यान नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

'आयडॉल'च्या पहिल्याच पेपरला 'लेटमार्क'
SHARES
Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थे (आयडॉल)च्या परीक्षेच्या पहिल्याच पेपरला 'लेटमार्क' लागल्याचं समोर आलं आहे. 'आयडॉल'च्या प्रथम वर्ष बी.ए. च्या 'कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश'चा पेपर सकाळी १० वाजता सुरू होणार होता. मात्र अजूनही हा पेपर सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.


विद्यापीठाची वेबसाईटच बंद

सोमवारपासून सुरू होणाऱ्या 'आयडॉल'च्या प्रथम वर्ष बी.कॉम. आणि बी.ए. परीक्षांच्या हॉलतिकीट वाटपाची घोषणा करताना यंदापासून ही हॉलतिकीटे विद्यार्थ्यांनी स्वतः च्या लॉग-इन आयडीवरून घेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाने काही वेबसाइटची घोषणा करत त्यावर हॉलतिकीट उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं.


नाहक त्रास

त्यानुसार विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळपासून वेबसाइटवर हाॅल तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असता विद्यापीठाची वेबसाईटच बंद पडली. यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेदरम्यान नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


तक्रारच आली नाही

यासंदर्भात 'मुंबई लाइव्ह'ने मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांना विचारणा केली असता 'आयडॉल'च्या प्रथम वर्ष बी.ए. पेपरबाबत माझ्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही.हेही वाचा-

'विद्यार्थ्यांनो काळजी नको', आयडॉल प्रवेशाची मुदत वाढवलीसंबंधित विषय
Advertisement