Advertisement

राखीव निकालांसाठी विद्यापीठाची नवीन वेबसाईट


राखीव निकालांसाठी विद्यापीठाची नवीन वेबसाईट
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या सर्व ४७७ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षांमध्ये जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. हे राखीव निकाल http://www.mumresults.in/ या वेबसाईटवर जाहीर केले जातील, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांनी दिली.

या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना मिळालेले गुणही पाहता येणार आहेत. हे निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी विद्यापीठामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाचे निकाल हा मोठा चर्चेचा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. ऑनलाईन पेपर चेकिंग पद्धतीमुळे निकाल लागण्यास मोठा विलंब झाला. आणि अखेर अनेक डेडलाईन दिल्यानंतर शेवटी सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. मात्र तरीही, काही विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने राखीव ठेवले होते. अशा विद्यार्थ्यांचे निकाल या नवीन वेबसाईटवर पहाता येणार असल्याचं विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं आहे.



हेही वाचा

निकाल लागले तरी, विद्यार्थ्यांवर टागंती तलवार कायम


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा