Advertisement

अखेर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू


अखेर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू
SHARES

सुधारित ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायदा’ आणण्याच्या नावाखाली राज्यातील सर्व विद्यापीठांच्या अधिसभेची निवडणूक प्रक्रिया एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. स्थगित झालेल्या अधिसभा निवडणुकीपैकी मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार मुंबई विद्यापीठाने अधिसभा आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून या प्रक्रियेची अधिसूचना २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.


६ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

अधिसभेवर प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक अशा ३ घटकांसाठी निवडणूक होणार आहे. तर अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख या घटकाच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील मतदार यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. ज्यांना या मतदार यादीसंदर्भात आक्षेप असेल त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक कुलसचिव यांच्याकडे ६ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावा.


दोन टप्प्यात निवडणुका

या अधिसभेच्या निवडणुका २ टप्प्यात घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक आणि अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख अशा ४ घटकांच्या प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात शिक्षक आणि नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात अधिसभेवर जाण्यासाठी १९ जागा आणि अभ्यास मंडळावर जाण्यासाठी ३ अशा एकूण २२ जागा असतील.


निवडणुकीचा कार्यक्रम:

तपशील
अंतिम दिनांक
वेळ
तात्पुरती मतदार यादी
 
२/१२/२०१७

आक्षेप
६/१२/२०१७
सायंकाळी ५ पर्यंत
दुरुस्त मतदार यादी
९ /१२/२०१७

कुलगुरूंकडे अपील
१३/१२/२०१७
सायंकाळी ५ पर्यंत



निवडणुकीतील पद आणि जागा:

पद
जागा
प्राचार्य
१०
संस्था प्रतिनिधी

विद्यापीठ अध्यापक

महाविद्यालयातील विभाग प्रमुख



महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार यावेळेस प्रथमच महाराष्ट्रातील विद्यापीठात अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुका होत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या निवडणुका यशस्वीरित्या होतील याचा मला विश्वास आहे.

- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यापीठ सज्ज असून याची सर्व तयारी विद्यापीठाने केली आहे. याचाच एक पहिला टप्पा म्हणून प्रशासनाने तयार केलेली तात्पुरती मतदार यादी आम्ही जाहीर करीत आहोत.

- डॉ. दिनेश कांबळे, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा