Advertisement

मुंबई विद्यापीठाची बी. कॉम. परीक्षा मंगळवारपासून

मुंबई विद्यापीठात सगळ्यात जास्त विद्यार्थी बी. काॅम.च्या परीक्षेला बसतात. त्यामुळे विद्यापीठासाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. याच मोठ्या परीक्षेने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचा आरंभ होतो. परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ७५:२५ या पॅटर्नचे नवीन विद्यार्थी तसंच ६०:४० या पॅटर्नचे जुने विद्यार्थी देखील बसणार आहेत.

मुंबई विद्यापीठाची बी. कॉम. परीक्षा मंगळवारपासून
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या थर्ड इयर बीकॉम सेमिस्टर ६ ची परीक्षा ३ एप्रिल पासून सुरू होत असून ही परीक्षा १८ एप्रिल २०१८ पर्यंत चालणार आहे. या परीक्षेला ७५, ३६० विद्यार्थी बसणार आहेत.

दोन्ही पॅटर्नचे विद्यार्थी

मुंबई विद्यापीठात सगळ्यात जास्त विद्यार्थी बी. काॅम.च्या परीक्षेला बसतात. त्यामुळे विद्यापीठासाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. याच मोठ्या परीक्षेने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांचा आरंभ होतो. परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ७५:२५ या पॅटर्नचे नवीन विद्यार्थी तसंच ६०:४० या पॅटर्नचे जुने विद्यार्थी देखील बसणार आहेत.

२८४ परीक्षा केंद्र

ही परीक्षा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व पालघर या जिल्ह्याच्या २८४ परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. तसंच राज्याबाहेर सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एका परीक्षा केंद्रावरही ही परीक्षा होत आहे.

वेळेवर निकाल लागतील

या परीक्षेसाठी परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा व निकाल विभाग, कॅप विभाग व संगणक विभागातील अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटूळे यांनी या परीक्षेच्या सज्जतेचा आढावा घेतला. यावेळी परीक्षा वेळेवर सुरू करुन, परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, असा विश्वास डॉ. अर्जुन घाटूळे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-

परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, मुंबई विद्यापीठाला उशीरा जाग

मुंबई विद्यापीठाचा 'मायमराठी' प्रकल्प, आता जगात कुठेही शिका मराठी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा