Advertisement

टी.वाय. बीकॉमचा निकाल 'निर्विघ्नपणे' जाहीर!


टी.वाय. बीकॉमचा निकाल 'निर्विघ्नपणे' जाहीर!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळानंतर पुढचे निकाल वेळेवर लावण्यात विद्यापीठाला अखेर यश आले आहे. मुंबई विद्यापीठाने सोमवारी रात्री तृतीय वर्ष बी कॉम सेमिस्टर ५ व ६ या परीक्षांचा निकाल जाहीर केला. सेमिस्टर ५ व ६ या दोन्ही परीक्षा मिळून विद्यापीठाने एकूण ९४,७४७ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे.


७८ हजार ५९४ परीक्षार्थी

टी वाय बी कॉम सेमिस्टर पाचच्या या परीक्षेला एकूण ७८,५९४ विद्यार्थी बसले होते. सदरचा निकाल ६२% लागलेला आहे. ग्रेड ओ - ३००७, ग्रेड ए - १६११४, ग्रेड बी- १२५८३ तर ग्रेड सी - ८९६७ विद्यार्थ्यांनी मिळवल्या आहेत.


२१० निकाल जाहीर

याचबरोबर विद्यापीठाने तृतीय वर्ष बी कॉम सेमिस्टर सहाचाही निकाल जाहीर केला असून या परीक्षेला १६,१५३ विद्यार्थी बसले होते. हा निकाल ४५.२४% लागला आहे. आजपर्यंत २१० निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.

तृतीय वर्ष बी कॉमचा निकाल अचूक व निर्दोष लावणे ही एक कसोटी होती. हा निकाल अचूक लावण्यासाठी व कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव राखीव राहू नये यासाठी यावेळी विशेष काळजी घेण्यात आली. यामुळेच ९४,७४७ विद्यार्थ्यांचे निकाल अचूकपणे लावण्यात विद्यापीठाला यश आले.

अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळहेही वाचा

एवढं झालं तरी...मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशांत वाढ!


संबंधित विषय