Advertisement

एवढं झालं तरी...मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशांत वाढ!


एवढं झालं तरी...मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशांत वाढ!
SHARES

गेले वर्षभर मुंबई विद्यापीठात सुरू असलेला ऑनलाईन तपासणी आणि परीक्षांचा निकाल हा गोंधळ कुणासाठीही नवीन नाही. मात्र या गोंधळानंतरही यावर्षी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात विविध पारंपरिक, व्यावसायिक, नाविन्यपूर्ण आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांसाठी २ लाख ६० हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. मागील शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये २ लाख ३७ हजार २३० विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला होता. यावर्षी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशात मोठी वाढ झाली असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.


8 वर्षांच्या प्रवेशांची आकडेवारी

शैक्षणिक वर्षप्रवेश
 २००९-१०२ लाख ४७६
२०१०-११२ लाख ३ हजार ४८३
२०११-१२२ लाख २ हजार ६३७
२०१२-१३१ लाख ९७ हजार ७७०
२०१३-१४२ लाख ३ हजार ६२९
२०१४-१५२ लाख ३३ हजार ९७९
२०१५-१६२ लाख ३४ हजार २३०
२०१६-१७२ लाख ३७ हजार ६६१


विद्यार्थ्यांचा यावर्षीचा प्रवेश

  • वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रमांकरता १ लाख ४४ हजार १४१ विद्यार्थी 
  • विज्ञान शाखेसाठी ४५ हजार ३८१ प्रवेश
  • कला शाखेसाठी ४२ हजार १६१ विद्यार्थ्यांचा प्रवेश
  • तंत्रज्ञान शाखेसाठी २३ हजार ३३७ विद्यार्थ्यांचा प्रवेश
  • विधी शाखेसाठी ५ हजार १२४ विद्यार्थ्यांचा प्रवेश 
  • फाईन आर्टसाठी ५०४ विद्यार्थ्यांचा प्रवेश

मुंबई विद्यापीठामार्फत पदवीपूर्व प्रवेशासाठी विविध शाखा निहाय एकूण ३६८ अभ्यासक्रम राबवले जातात. यामध्ये कला शाखेसाठी १६५ अभ्यासक्रम, वाणिज्य (३२), विज्ञान (३९), विधी (०६), तंत्रज्ञान (११), फाईन आर्ट (२६), अॅडऑन कोर्सेस (६७), बीव्होक (०१) आणि गरवारे संस्थेमार्फत (२१) असे विविध ३६८ अभ्यासक्रम राबवले जात असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.


यंदाच्या प्रवेशांत झालेली वाढ हे विद्यार्थ्यांमध्ये मुंबई विद्यापीठाविषयी असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. गेल्या १६१ वर्षांत मुंबई विद्यापीठाने ज्या आत्मविश्वासानं विद्यार्थ्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली आहे त्याचंच हे फळ आहे.


देवानंद शिंदे, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा

एम कॉमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही, विद्यापीठाचं आश्वासन

एलएलएमच्या विद्यार्थ्यांना दिलासा, मुंबई विद्यापीठाला दणका!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा