परीक्षा झाल्या, आता निवडणुका; विद्यापीठाचे ये रे माझ्या मागल्या!

सिनेट निवडणुकीत चाललेला सावळा गोंधळ पाहून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांसाठीची मानसिकता आणि तयारीच नसल्याचा ठपका ठेवण्यात येतोय. विद्यापीठाकडे सिनेट निवडणुकांसाठी तब्ब्ल ६० हजार मतदारांची नावे आली आहेत. मात्र, त्यात विद्यापीठाकडून नावांचा आणि त्यांच्या इतर तपशीलांचा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

SHARE

गेल्या वर्षभरात मुंबई विद्यापीठने ऑनलाईन पेपर तपासणी आणि त्यानंतर परीक्षांमध्ये घातलेला गोंधळ सगळ्यांनी पाहिला. विद्यार्थ्यांनी तर तो प्रत्यक्षात अनुभवला, सहन केला. पण, फक्त परीक्षा होत्या म्हणून नव्हे, तर एरवीही विद्यापीठाचा कारभार सध्या गोंधळाचाच सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण, आधी परीक्षांमध्ये गोंधळ घालणाऱ्या विद्यापीठाने आता सिनेट निवडणुकांमध्येही गोंधळ घातला आहे.


सिनेट निवडणुकांची तयारीच नाही?

मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे वाहतायत. मात्र, या वाऱ्यांची दिशा कोणालाच कळत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिनेट निवडणुकीत चाललेला सावळा गोंधळ पाहून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकांसाठीची मानसिकता आणि तयारीच नसल्याचा ठपका ठेवण्यात येतोय. विद्यापीठाकडे सिनेट निवडणुकांसाठी तब्ब्ल ६० हजार मतदारांची नावे आली आहेत. मात्र, त्यात विद्यापीठाकडून नावांचा आणि त्यांच्या इतर तपशीलांचा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.


पोचपावती मिळूनही यादीत नाव नाही!

मनविसेतर्फे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी स्वतः अर्ज भरला. त्यांच्यासोबत २५६५ अर्ज नोंदवले गेले. मात्र, ज्यावेळी विद्यापीठाकडून मतदारांची यादी जाहीर करण्यात आली, त्यावेळी खुद्द मनविसे अध्यक्षांचेच नाव यादीत नसल्याचा प्रकार समोर आलाय. आदित्य शिरोडकर यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना त्याची पोचपावतीही मिळाली. तरी त्यांचे मतदार यादीत नाव नसणे हे हास्यास्पद आहे. 'यावरून विद्यापीठ आपल्या कामात किती लक्ष देतेय, याची प्रचिती येते', असं मत मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी व्यक्त केलंय.


विद्यापीठाच्या कामातील गोंधळ निदर्शनास आणून झाला. आंदोलने करून झाली. आता विद्यापीठाचा कारभार सुरळीत होण्यासाठी नेमका कोणता मार्ग अवलंबायचा? हेच कळत नाही. गेली अडीच वर्ष सिनेट निवडणुका झाल्या नाहीत. तरीही याचे गांभीर्य विद्यापीठाला नाही.

संतोष गांगुर्डे, उपाध्यक्ष, मनविसे


वेबसाईटवर मतदार याद्याच दिसेनात!

सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठाने पदवीधर मतदारसंघाच्या तात्पुरत्या मतदारयाद्या मंगळवारी जाहीर केल्या. विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर झालेल्या मतदारयाद्या आधी दिसतच नव्हत्या. आणि जेव्हा दिसल्या, तेव्हा त्यातला घोळ समोर आल्याची माहिती मनविसेचे संतोष गांगुर्डे यांनी दिली. शर्मिला ठाकरे यांच्याही नावात चूक करण्यात अली असून, त्यांचा जन्मदिनांकही चुकवला असल्याची माहिती त्यांनी दिली.हेही वाचा

मुंबई विद्यापीठाच्या विकासाचं ब्ल्यू प्रिंट २ पानांत कसं शक्य?


संबंधित विषय
ताज्या बातम्या