Advertisement

चूक विद्यापीठाची, त्रास विद्यार्थ्यांना!


चूक विद्यापीठाची, त्रास विद्यार्थ्यांना!
SHARES

विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून त्याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना होणार असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शवली आगे. विद्यापीठात सध्या एम कॉम( पार्ट १)च्या परीक्षा सुरु आहेत. एम कॉमच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला नवीन प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्या हाती जुन्या पॅटर्नच्याच प्रश्नपत्रिका पडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी हे निदर्शनास आणूनही विद्यापीठाकडून याच प्रश्नपत्रिका मिळाल्याचे कारण देत त्यांना तोच पेपर लिहिण्यास भाग पाडले जात आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.


महाविद्यालयांची हतबलता

रवी सिंह हा एम कॉम (पार्ट १)चा विद्यार्थी असून के बी पी हिंदुजा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला जय हिंद कॉलेज परीक्षा केंद्र आले आहे. नेहमीप्रमणे तो परीक्षा देण्यासाठी गेला असताना त्याच्या हाती नवीन पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकेऐवजी जुन्या पॅटर्नचीच प्रश्नपत्रिका आली. त्याच्यासोबत असणाऱ्या इतर ४० विद्यार्थ्यांनी आणि त्याने तिथे असलेल्या सुपरवायझरच्या निदर्शनास ही गोष्ट आणली. मात्र, त्यांनी याबाबतीत कोणतीही कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली. सदर प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून आल्याने आपण त्यात फेरफार करू शकत नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. परिणामी विद्यार्थ्यांना तीच प्रश्नपत्रिका लिहावी लागली.


विद्यापीठाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना का? विद्यापीठाने पुनर्परीक्षा घेतली, तर विद्यार्थ्यांना त्रास आणि नाही घेतली तरी कमी गुणांमुळे पुन्हा विद्यार्थ्यांनाच त्रास होणार आहे. या संदर्भात लवकरच विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करण्यात येईल.

रवी सिंह, विद्यार्थी, एम कॉम


पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्यांना त्रास

इतर ठिकाणी चौकशी केली असता काही महाविद्यालयांना जुन्या पॅटर्नच्या, तर काही महाविद्यालयांना नवीन पॅटर्नच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून पोहोचल्या आहेत. यामधून विद्यापीठाचा अनागोंदी कारभार दिसून येत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. तसेच, या प्रकरणासंबंधी परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे याना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा