Advertisement

एम कॉमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही, विद्यापीठाचं आश्वासन


एम कॉमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही, विद्यापीठाचं आश्वासन
SHARES

मुंबई विद्यापीठातील गोंधळ संपता संपत नाहीये आणि आता त्यामुळे विद्यापीठावर खुलासा करण्याची नामुष्की ओढवली आहे. सोमवारी एम कॉम परीक्षेत विद्यार्थ्यांना जुन्या पॅटर्नच्या प्रश्नपत्रिकांचे वाटप काही महाविद्यालयांत करण्यात आले. त्याची दखल घेऊन विद्यापीठाला 'विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल,' असा खुलासा करावा लागला आहे.


विद्यार्थ्यांवर जुन्याच अभ्यासक्रमाची सक्ती

सोमवारी एम कॉमच्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट विषयाचा पेपर एकूण ९६ केंद्रांवर पार पडला. या परीक्षेची बैठक व्यवस्था असलेल्या महाविद्यालयांशी संपर्क केला असता एकूण ९६ परीक्षा केंद्रांपैकी ०५ परीक्षा केंद्रांनी चुकीच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरीत केल्याचे दिसून आले होते. विद्यार्थ्यांकडून हे परीक्षा निरीक्षकांच्या निदर्शनास आणूनही त्यांना तीच प्रश्नपत्रिका लिहिण्यास भाग पाडण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या तक्रारी विद्यार्थी तक्रार निवारण कक्षाकडेही केल्या.


विद्यापीठाने दिले आश्वासन

या प्रकरणाची नोंद घेऊन विद्यापीठाने यासंदर्भात चौकशी केली. या बाबतीतील सदर निवेदन प्राश्निक समितीच्या अध्यक्षांकडे त्वरीत पाठविण्यात येईल व विद्यापीठातर्फे संबंधित विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल व त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे असे आश्वासन विद्यापीठातर्फे देण्यात आले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा