Advertisement

बीएससी तृतीय वर्षाचा निकाल जाहीर

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवार १५ फेब्रुवारी रात्री रोजी तृतीय वर्ष बी.एस.सी सत्र पाचचा निकाल जाहीर केला आहे.

बीएससी तृतीय वर्षाचा निकाल जाहीर
SHARES

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुंबई विद्यापीठानं घेतलेल्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. शुक्रवार १५ फेब्रुवारी रात्री रोजी तृतीय वर्ष बी.एस.सी सत्र पाचचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेस ९ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ३९४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ४ हजार १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ४५.०१% टक्के इतकी या निकालाची टक्केवारी आहे. दरम्यान शुक्रवारी एकूण सात निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत १७० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.


३७,१६१ उत्तरपत्रिका १,१७० शिक्षक

मुंबई विद्यापीठाकडे तृतीय वर्ष बीएससीच्या परीक्षेमध्ये तपासणीसाठी ३७ हजार १६१ उत्तरपत्रिका दाखल झाल्या होत्या. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी १ हजार १७० शिक्षकांद्वारे करण्यात आली असून, एकूण ५ हजार ९५६ उत्तरपत्रिकांचं मॉडरेशन करण्यात आलं.


बीएससीचा सुधारित अभ्यासक्रम

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बीएससीच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली असून, यासाठी पसंतीनुसार श्रेणी पद्धत (Choice base credit system) राबविण्यात आली आहे. बीएससी सत्र पाचच्या परीक्षेत अक्च्युरल सायन्स, बायोकेमिस्ट्री, इलेक्ट्राॅनिक्स, सायकोलॉजी, बॉटनी, स्टॅटीस्टीक्स, मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, जिओग्राफी, मॅथेमॅटिक्स, लाईफ सायन्स, जीऑलॉजी, फिजिक्स, झुलॉजी व ह्युमन सायन्स अशा १५ विषयांचा समावेश आहे.


आठ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठानं बीएससी सत्र पाचसोबत विविध परीक्षांचे सात निकाल जाहीर केले आहेत. यात अभियांत्रिकी शाखेचे बीई सत्र आठ कम्प्युटर इंजिनिअरींग, बीई सत्र आठ आयटी, बीई सत्र आठ बायोमेडिकल इंजिनिअरींग, बीई सत्र सात इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरींग या पाच परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे. तसंच बी.कॉम सत्र पाच व सहा (७५:२५ जुना अभ्यासक्रम) या वाणिज्य शाखेच्या दोन परीक्षांचेही निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान बीएससी व्यतिरिक्त इतर सात परीक्षांमध्ये १ हजार ४९१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात १ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.



हेही वाचा - 

'कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंची हकालपट्टी

पुलवामा हल्ला : विराटनं केला पुरस्कार सोहळा स्थगित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा