अाठवडाभरात लागणार सगळे निकाल?

  येत्या सहा दिवसांत सगळे निकाल जाहीर करू, असं मुंबई विद्यापीठाने जाहीर केलं आहे.

  Mumbai
  अाठवडाभरात लागणार सगळे निकाल?
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला मोठ्या थाटात सर्वच्या सर्व ४७७ निकाल जाहीर केल्याची घोषणा केली; मात्र पूनर्मुल्यांकनाचे आणि गहाळ उत्तरपत्रिकांचे निकाल अद्यापही जाहीर झालेले नाहीत. हे निकाल येत्या ६ दिवसांत जाहीर होतील, असं मुंबई विद्यापीठाने सांगितलं आहे.

  दमत थकत का होईना, मुंबई विद्यापीठाने १९ सप्टेंबरला सर्व निकाल लागल्याचे जाहीर केलं. मात्र निकालांत असंख्य त्रुटी राहिल्याने ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी त्वरीत पूनर्मुल्यांकनासाठी अर्ज केले. पूनर्मुल्यांकनाचे निकाल आणि गहाळ उत्तरपत्रिकांमुळे राखीव निकालाचे ओझे अद्यापही विद्यापीठावर आहे. तर ऑक्टोबरचा दुसरा महिना उजाडला तरी निकाल हाती न आल्याने विद्यार्थी त्रस्त झालेत.  


  आजपर्यंत अंदाजे ३, ७०० उत्तरपत्रिका तपासण्याचं काम शिल्लक आहे. तर जवळपास २,३०० विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम विद्यापीठात सुरू आहे. सरासरी गुण देताना अडचणी निर्माण होत आहेत. कधी तांत्रिक अडचणी, तर कधी कागदपत्रातील अडचणी. ज्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात आले आहेत, त्यांची यादी आम्ही लवकरच वेबसाईटवर जाहीर करणार आहोत. येत्या ६ दिवसांत मुंबई विद्यापीठाचे जवळपास सर्वच निकाल जाहीर करण्यात येतील

  - अर्जुन घाटूळे, प्रभारी परीक्षा नियंत्रक  हेही वाचा - 

  म्हणून अमेयने उपोषण मागे घेतलं  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.