Advertisement

कॉलेज तरुणीनं साकारला मेट्रोचा लोगो


SHARES

मुंबई - मेट्रोचा हा लोगो कोणा मोठ्या कंपनीनं वा कलाकारानं बनवलेला नाहीये. तो बनवलाय मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजची विद्यार्थिनी जुईली माहीमकरनं. एमएमआरडीएने जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधील विद्यार्थ्यांना लोगो तयार करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्यानुसार 500 विद्यार्थ्यांनी लोगो तयार केले. त्यातून 20, 10 आणि मग 4 लोगो बाजूला करण्यात आले आणि सरतेशेवटी बाजी मारली ती जुईलीने तयार केलेल्या लोगोनं. या लोगोमध्ये मुंबईचं जणू चित्रच झळकतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी मुंबई मेट्रोच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. जुईलीनं रेखाटलेला हाच लोगो मेट्रोची ओळख बनणार आहे....

संबंधित विषय
Advertisement