Advertisement

मुंबईत पहिले रोबोटिक नी रिप्लेसमेंट केंद्र सुरू

एसीआय-कुंबल्ला हिल हॉस्पिटलच्या नी क्लिनिकनं मुंबईत पहिल्या रोबोटिक नी रिप्लेसमेंट सेंटरची स्थापना केली आहे.

मुंबईत पहिले रोबोटिक नी रिप्लेसमेंट केंद्र सुरू
SHARES

गुडघ्याची शस्त्रक्रिया देशात अनेक दिवसांपासून होत आहे. पण आतापर्यंत यामध्ये हवे तसे यश मिळाले नव्हते. एवढेच नाही, तर या शस्त्रक्रियेत यशाची शंभर टक्के खात्रीही मिळत नव्हती. पण आता ही शस्त्रक्रिया आपल्या देशातच एक रोबो करणार आहे, तेही न चुकता.

एसीआय-कुंबल्ला हिल हॉस्पिटलच्या नी क्लिनिकनं मुंबईत पहिल्या रोबोटिक नी रिप्लेसमेंट सेंटरची स्थापना केली आहे. गुडघ्याच्या उपचार प्रक्रियेसाठी NAVIO-CORI रोबोटिक्स प्लॅटफॉर्मची ही नवकल्पना या दशकातील अग्रगण्य आरोग्य सेवांपैकी एक आहे. नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेच्या आधुनिक युगाची ही सुरुवात आहे.

गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेचे हे भविष्य असल्याचा विश्वास, गुडघा शल्यचिकित्सक डॉ. मितेन शेठ, एमएस, डीएनबी (ऑर्थोपेडिक्स) यांनी केला.

“गुडघ्याच्या शस्त्रक्रियांसाठी आम्ही रोबोटिक्सच्या सहाय्यानं एक आधुनिक सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचा मला आनंद होतो आहे. मला खात्री आहे की यामुळे रूग्ण कमी वेदना, जास्त रक्त वाया न जाता, तसंच अधिक दिवस हॉस्पिटलमध्ये न राहता लवकर बरे होतील,” असा विश्वास डॉ. मितेन शेठ, एमएस, डीएनबी यांनी व्यक्त केला.

पारंपारिक पद्धतीनं केली जाणारी नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया, सर्जनची अंमलबजावणी किंवा संगणकीय नियोजनावर अवलंबून असते. मात्र रोबोटिक नी रिप्लेसमेंट प्रक्रियेमध्ये नियोजन आणि अंमलबजावणी या दोन्ही गोष्टींसाठी रोबोटिक्सची मदत घेता येऊ शकते.

दरम्यान, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “अशा उपक्रमाचा एक भाग आणि आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रगतीचा साक्षीदार होताना मला आनंद होत आहे. आपल्या गतिशील देशाच्या प्रगती आणि वाढीसाठी रोबोटिक्स नी रिप्लेसमेंट सारख्या तांत्रिक पद्धती अत्यावश्यक आहेत. मॉ नी क्लिनिकच्या टीमला शुभेच्छा देते आणि आशा करते की आपण याद्वारे देशात जास्तीत जास्त लोकांची सेवा कराल.”

वेटलिफ्टिंगमध्ये भारताची पहिली ऑलिम्पिक पदक विजेती कु. कर्णम मल्लेश्वरी यांनी सांगितलं की, “कर्णम मल्लेश्वरी फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष या नात्यानं, मला असं वाटते की, अशा प्रकारच्या तांत्रिक क्रांतींना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. क्रीडा क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे चांगली मदत होऊ शकेल. खेळाडूंना अनेक वेळा दुखापतींच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. तंत्रज्ञानासह भारतीय क्रीडा परिसंस्थेपर्यंत आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आपण एकत्र काम करू आणि सर्वोत्तम उपचार सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांना पार करू.”



हेही वाचा

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल; १ कोटी ७९ लाख नागरीकांचा दुसरा डोस पूर्ण

कोरोनाची तिसरी लाट आधीच आली, किशोरी पेडणेकर यांची माहिती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा