Advertisement

कोरोनाची तिसरी लाट आधीच आली, किशोरी पेडणेकर यांची माहिती

दरम्यान मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता गेल्या आठवड्यात काही सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट आधीच आली, किशोरी पेडणेकर यांची माहिती
SHARES

कोरोनाची (Corona) तिसरी लाट (Third wave) आधीच आली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता घेणं आवश्यक आहे, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “माझं घर माझा बाप्पा, माझं मंडळ माझा बाप्पा अशी संकल्पना आणली आहे. माझ्या गणपतीला सोडून कुठेही जाणार नाही. यामुळे लोकं इकडे तिकडे फिरणार नाही. बिना मास्कचे तिथे बसणार नाही. मंडळातील सदस्यही जबाबदारी घेत आहेत. मी कुठेच जाणार नाही. तिसरी लाट येणार आहे, असं नाही. तर आली आहे.”

दरम्यान मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता गेल्या आठवड्यात काही सूचना करण्यात आल्या आहेत. एखाद्या इमारतीत ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जाणार आहे. सील केलेल्या इमारतीच्या गेटवर पोलीसही तैनात केले जाणार आहेत.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचं ठरवण्यात आलं आहे.

राज्य सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. गर्दी होणार नाही यासाठी अजूनही अनेक निर्बंध लागू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही कोरोना रुग्ण वाढले तर पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं स्पष्ट केलं आहे.

मुंबईत सोमवारी ३७९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर ४१७ रुग्णांनी करोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मुंबईत आतापर्यंत ७ लाख २४ हजार ४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर ३ हजार ७७१ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना दुप्पटीचा दर १२९० दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर करोना रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.

राज्यात दिवसभरात ३ हजार ८९८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, ३ हजार ३ हजार ५८१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय आज राज्यात ८६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.



हेही वाचा

कोरोनाची तिसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांनी सतर्क रहावं, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या ५ शहरांच्या यादीत मुंबई, ठाण्याचंही नाव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा