Advertisement

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या ५ शहरांच्या यादीत मुंबई, ठाण्याचंही नाव

मुंबई पुन्हा एकदा सर्वाधिक सक्रिय रुग्णांसह महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समाविष्ट झाली आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या ५ शहरांच्या यादीत मुंबई, ठाण्याचंही नाव
SHARES

शहरात कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत. मुंबई पुन्हा एकदा सर्वाधिक सक्रिय रुग्णांसह महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये समाविष्ट झाली आहे.

अहवालांनुसार, महाराष्ट्रातील सकारात्मकता दर गेल्या आठवड्यात २.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे जो ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात २.५८ टक्के होता.

ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईत कोविड रुग्णांची आकडेवारी २०० ते ३०० दरम्यान नोंदवली गेली.

कोविड -१९ संदर्भातील व्हर्च्युअल कॉन्फरन्स बैठकीत, आरोग्य विभागानं सांगितलं की, गेल्या १० दिवसांत राज्यात सक्रिय प्रकरणांमध्ये थोडी वाढ झाली आहे.

राज्याच्या एकूण सक्रिय प्रकरणांपैकी पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास ७२ टक्के वाटा असल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. सुमारे ३०% वाटा पुण्याचा असून पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ठाणे (१४%), सातारा (१२%), अहमदनगर (१०%) आणि मुंबई (८%) आहे.

दरम्यान, राज्यातील ८ जिल्ह्यांनी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त साप्ताहिक सकारात्मकता नोंदवली आहे. यात पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद आणि नाशिक यांचा समावेश आहे.



हेही वाचा

लसीकरणात मुंबई अव्वल, १ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा