Advertisement

लसीकरणात मुंबई अव्वल, १ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण


लसीकरणात मुंबई अव्वल, १ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रयत्नांनंतर, मुंबई देशातील पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे एक कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. CoWIN पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारपर्यंत १ कोटी ६३ हजार ४९७ लोकांना कोरोनाची लस मिळाली आहे.

यापैकी ७२ लाख ७५ हजार १३४ असे लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि २७ लाख ८८ हजार ३६३ असे लोक आहेत ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

पालिकेच्या मते, मोहीम सुरू झाल्यानंतर, २७ ऑगस्ट रोजी सर्वात जास्त १ लाख ७७ हजार १७ लोकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ५०७ ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. यापैकी ३२५ शासकीय केंद्रे आहेत, तर १८२ केंद्रे खासगी रुग्णालये चालवतात.

कोविन पोर्टलनुसार २१ ऑगस्ट रोजी मुंबईत १ लाख ६३ हजार ७७५ लाख लोकांना लसीकरण करण्यात आले. यानंतर २३ ऑगस्ट रोजी १ लाख ५३ हजार ८८१ लोकांना लसीकरण करण्यात आले.

पालिका आता येत्या काळात दुसऱ्या डोस असलेल्या लोकांचे लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या भागात, फक्त दुसऱ्या डोसच्या लोकांना शनिवारी संपूर्ण शहरात लस मिळाली.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईत ४२२ नवीन कोविड -19 प्रकरणे नोंदवली गेली. सलग तिसऱ्या दिवशी ४०० पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत. आता एकूण कोरोनाचा आकडा वाढून ७,४५,४३४ झाला आहे. तर मृतांची संख्या १५,९८७ झाली आहे.

१ आणि २ सप्टेंबर रोजी शहरात ४१६ आणि ४४१ कोविड -19 प्रकरणे होती. यावर्षी ४ एप्रिल २०२१ रोजी मुंबईत सर्वाधिक ११,१६३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर १ मे रोजी साथीच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९० मृत्यूंची नोंद झाली. १६ ऑगस्ट रोजी या वर्षी सर्वात कमी १९० प्रकरणांची नोंद झाली.



हेही वाचा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठा ९० टक्क्यांवर

मलमुत्र, ओल्या कचऱ्यापासून नवी मुंबईत उभारला बायोगॅस प्रकल्प

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा