Advertisement

मलमुत्र, ओल्या कचऱ्यापासून नवी मुंबईत उभारला बायोगॅस प्रकल्प

तयार झालेला बायोगॅस झोपडपट्टीतील घरांमध्ये मोफत दिला जावू लागला आहे.

मलमुत्र, ओल्या कचऱ्यापासून नवी मुंबईत उभारला बायोगॅस प्रकल्प
SHARES

नवी मुबंई महागरपालिकेकडून चिंचपाडा इथं बायोगॅसचा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. महानगरपालिकेनं मलमुत्र आणि ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे.

चिंचपाडा झोपडपट्टी भागातून निघणारे मलमुत्र आणि ऐरोली परिसरातील हॉटेल मधून येणारा ओला कचरा यांना एकत्र करून यातून बायोगॅस निर्मिती सुरू केला आहे. तयार झालेला बायोगॅस झोपडपट्टीतील घरांमध्ये मोफत दिला जावू लागला आहे. महिन्याला गॅस सिलेंडरसाठी हजार ते दीड हजार होणारा खर्च वाचू लागला आहे.

खासदार राजन विचारे यांचा फंड आणि खाजगी कंपन्यांकडून मिळालेल्या सीएसआर फंडातून बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला ५ टन कचर्यातून बायोगॅस आणि ३०० युनिट विजेची निर्मिती केली जात आहे.

ओला कचऱ्याची जास्तीत जास्त उपलब्धता निर्माण झाल्यास आजूबाजूच्या २५ हजार घरांना मोफत घरगुती गॅस जोडणी येत्या काही महिन्यात दिली जाणार आहे. महानगर पालिकेतील प्रशासनाकडून गोळा केला जाणारा सर्व ओला कचरा या प्रकल्पासाठी द्यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक विजय चौगुले यांनी केली आहे.

महागरपालिका प्रशासनानं चिंचपाडा झोपडपट्टीत बायोगॅस प्रकल्प सुरू केल्यानं अनेक पर्यावरणपुरक फायदे होवू लागवे आहेत. घरगुती गॅसची उपलब्धता, मोफत विज, ओला कचरा आणि मलमुत्राची त्याच ठिकाणी विल्हेवाट होऊ लागल्यानं डंम्पिंग ग्राऊंड, एसटीपी प्लांटवरील भार कमी झाला. यामुळे शहरातील प्रत्येक नोडमध्ये बायोगॅस प्रकल्प सुरू करणार असल्याचे आयुक्त अभीजीत बांगर यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा

माहीम समुद्र किनाऱ्याचे सुशोभिकरण, पर्यटनाला चालना देण्यासाठी केले 'हे' बदल

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल बंद, १ महिन्यापूर्वीच झालं होतं उद्घाटन

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा