Advertisement

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल बंद, १ महिन्यापूर्वीच झालं होतं उद्घाटन

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले.

घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपूल बंद, १ महिन्यापूर्वीच झालं होतं उद्घाटन
SHARES

घाटकोपर-मानखुर्द या नवीन उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे.

यामध्ये वाहनांचा वेग नियंत्रित करण्याकरिता पुलाच्या दोन्ही बाजुनं दर ५०० मीटर अंतरावर गतिरोधक बसवणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, गतिरोधक दर्शक फलक बसविणे, डांबराच्या पृष्ठभागावर (मास्टिक अस्फाल्ट) वाहनं घसरू नये यासाठी सदर पृष्ठभाग खरबडीत (मिलिंग) करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसवणे या उपाययोजनांचा यामध्ये समावेश आहे.

हा उड्डाणपूल ५० किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहन नेण्यसाठी संकल्पित आहे. असं असलं तरी, या उड्डाणपुलावरून चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक खूप जास्त वेगानं वाहनं चालवत असल्याचं निदर्शनास आलं आहे. परिणामी, सदर वाहनचालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

या उड्डाणपुलावर वाहनचालकांचा वेग नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत अतिरिक्त उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये पुलाच्या दोन्ही वाहिनीवर दर ५०० मीटर अंतरावर गतिरोधक बसवणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, गतिरोधक दर्शक फलक बसवणे, डांबरी पृष्ठभागावर (मास्टिक अस्फाल्टवर) वाहनं घसरू नये, यासाठी पृष्ठभाग खरबडीत (मिलिंग) करणे आणि अतिरिक्त रम्बलर्स बसवणे, या उपाययोजना प्रस्तावित आहेत.

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण १ ऑगस्ट २०२१ रोजी करण्यात आले. मानखुर्द वाहतूक विभागाच्या समन्वयानं ३ मीटर उंचीपर्यंतच्या हलक्या वाहनांसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात आलेला आहे.

उच्च दाबांच्या तारांची उंची वाढवण्यासाठी देखील काम हाती घेतलं जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडे महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. तसंच, सदर जागा ताब्यात मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत वीज तारा अधिक उंचीवर नेल्यानंतर या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.



हेही वाचा

रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करा- उद्धव ठाकरे

म्हाडा मुंबई मंडळाकडे विक्रमी अधिमूल्य महसूल जमा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा