Advertisement

कोरोनाची तिसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांनी सतर्क रहावं, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन


कोरोनाची तिसरी लाट; ‘या’ ५ जिल्ह्यांनी सतर्क रहावं, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन
SHARES

राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी ७० टक्के रुग्ण या जिल्ह्यांमध्ये असल्यानं कोरोना सुसंगत वर्तन, लसीकरणाला प्राधान्य आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, या ५ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसेना. आजच्या तारखेला तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत याच जिल्ह्यांचा ७० टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पुण्यात सध्या १२४१३ , सातारा जिल्ह्यात ६३२८, मुंबईत ४२७३, रत्नागिरी जिल्ह्यात १०८१ आणि अहमदनगरमध्ये ४९७५ सक्रिय रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात १२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, दिवसभरात ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय ११८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि चिपळूण तालुक्यात आहेत. सातारा जिल्ह्यात सोमवारी ३०८ नव्या कोरोना रुग्णांची नोदं झाली तर, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा