Advertisement

मेरिट ट्रॅकच्या विरोधात विद्यार्थीही मैदानात, गुन्हा दाखल करण्याची मागणी


मेरिट ट्रॅकच्या विरोधात विद्यार्थीही मैदानात, गुन्हा दाखल करण्याची मागणी
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन निकालात गोंधळ घालणाऱ्या मेरिट ट्रॅक कंपनीची हकालपट्टी करण्याचे संकेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. तर आता त्यापाठोपाठ विद्यार्थीही मेरिट ट्रॅकच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने या कंपनीच्या कारभारावर संताप व्यक्त करत मेरिट ट्रॅकबरोबरच ऑनलाईन निकालाचे कंत्राट या कंपनीला देणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या समितीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना नाराज

यंदा प्रथमच मुंबई विद्यापीठाने ऑनलाइन निकाल लावण्याचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय विद्यार्थ्यांचीच डोकेदुखी ठरली आहे. नोव्हेंबर महिना उजाडला तरी अजूनही विद्यार्थ्यांना निकालाची वाट पाहावी लागत आहे. इतके घोळ घातल्यानंतरही मुंबई विद्यापीठ मेरिट ट्रॅक कंपनीचे देय अजूनही फेडत होते. त्यामुळे कंपनीचा करार रद्द झालाच पाहिजे असे म्हणत राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठ समितीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


मुंबई विद्यापीठाच्या अतिशय मनमानी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. याची भरपाई मेरिट ट्रॅक कंपनीने करायलाच हवी. त्याची मोजदाद पैशात करताच येणार नाही. परंतु दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. यामुळे गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आम्ही पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांची भेट घेतली आणि कंपनीवर गुन्हा गाखल करण्याची मागणी केली आहे. उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून माहिती मागवून योग्य ती करवाई केली जाईल, असे अश्वासन कुंभारे यांनी यावेळी आम्हाला दिले.
- अॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा