Advertisement

तात्पुरत्या प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक


तात्पुरत्या प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक
SHARES

निकालास कमालीची दिरंगाई झाल्याने पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत येणाऱ्या कित्येक महाविद्यालयांनी तात्पुरत्या प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांना लुबाडल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी केला आहे.


'तरीही लाज वाटत नाही'

एप्रिल २०१७ सालच्या ऐतिहासिक निकाली गोंधळाच्या फटक्यातून विद्यापीठ प्रशासन अद्यापही सावरलेले नाही. या गोंधळात विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला तात्पुरता प्रवेश देण्याची सूचना मुंबई महाविद्यापीठाने केली. या तात्पुरत्या प्रवेशाच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पहिल्या वर्षाची फीदेखील भरली. पण निकाल रखडल्याने तात्पुरत्या प्रवेश प्रक्रियेचा काहीच फायदा झाला नाही, अशी तक्रार मातेले यांनी केली. विद्यापीठाने पूनर्मूल्यांकनाचा निकाल रखडवला, अजूनही छायांकित प्रती मिळत नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. वर्ष संपत आले तरीही हा गोंधळ संपला नसल्याने विद्यापीठाला लाज कशी वाटत नाही? असा प्रश्नही अमोल मातेले यांनी विचारला.


...म्हणून तक्रार केली नाही 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊनही निकालाची प्रत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचं वर्ष आणि फीचे पैसेही वाया गेले. महाविद्यालयांनी फीचे पैसे परत देण्यास नकार दिल्याने विद्यार्थी पुरते हवालदील झाल्याची तक्रार मातेले यांनी केली. विद्यार्थी भीतीपोटी तक्रार करत नसल्याने मुंबई विद्यापीठाने याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटनेकडून करण्यात आली आहे.


परीक्षा विभागाचे संचालक नक्की कोण?

परिक्षा भवनात एककेंद्री निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांना निकाल मिळण्यास अडचणी येत आहेत. प्रभारी संचालक म्हणवत दिवस ढकलणाऱ्या डॉ. अर्जुन घाटुळे आणि माजी संचालक दीपक वसावे यांच्यातील मतभेदांचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यांच्यातील मतभेदांमुळे नक्की विद्यापीठ कोण चालवत आहे? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

अमोल मातेले, अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मुंबई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा