Advertisement

NEET परीक्षेचा निकाल जाहीर होणार, सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

NEET परीक्षेचा निकाल जाहीर होणार, सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील
SHARES

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला आहे. परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. सोबतच २ आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाल स्थगिती देत हा निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकेत काही त्रुटी असल्याची याचिका काही दिवसांपुर्वीच दोन विद्यार्थ्यांनी दाखल केली होती. त्यामुळे NEET चा निकाल काही काळ थांबवण्यात आला होता.

मात्र आता न्यायालयानं यावर सुनावणी करत म्हटलं आहे की, 'दोन विद्यार्थ्यांसाठी आपण १६ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ठेवता येणार नाही'. तसंच याचिकाकर्ता वैष्णवी भोपाले आणि अभिषेक कापसे यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे सांगत दोन आठवड्यात त्यांचा निकाल घोषित करण्याचे सांगितलं आहे.

निकालाला उशीर झाल्यामुळे एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अशा मेडिकल पाठ्यक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार आहे.

याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, त्यांना देण्यात आलेली टेस्ट बुकलेट आणि अन्सर बुकलेट मॅच करत नव्हती. या उमेदवारांनी तत्काळ निरीक्षकांच्या समोर हा मुद्दा मांडला होता. मात्र त्यावेळी त्यांचं म्हणणे ऐकूनही घेण्यात आलं नव्हतं.



हेही वाचा

१८ वर्षांहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांनी 'असा' मिळवा लोकलचा पास

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा