Advertisement

TYBCOM परिक्षेतील कॉपीप्रकरणी पोलीस करणार चौकशी

बोरिवलीमधील सेंट रॉक्स महाविद्यालयात ८ एप्रिल रोजी टि. वाय. बीकॉमच्या परिक्षेत 'मार्केटींग' आणि 'मार्केटींग अॅण्ड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट'(एमएचआरएम) या पेपरदरम्यान एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला होता.

TYBCOM परिक्षेतील कॉपीप्रकरणी पोलीस करणार चौकशी
SHARES

बोरिवलीमधील सेंट रॉक्स महाविद्यालयात ८ एप्रिल रोजी टि. वाय. बीकॉमच्या परिक्षेत 'मार्केटींग' आणि 'मार्केटींग अॅण्ड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट'(एमएचआरएम) या पेपरदरम्यान एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला होता. या पेपरमधील प्रश्नांची उत्तर व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठवण्यात आली होती. ही उत्तरं पाहून त्या विद्यार्थ्यानं पेपर लिहील्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात व्यवस्थापन अधिकाऱ्याचा देखील सहभागी असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्याशिवाय, याबाबत शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली असून, आयटी कायद्याच्या कलमार्तंगत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


चौकशी झाल्याशिवाय अटक नाही

या प्रकरणी पोलिसांनी, चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही अटक करता येणार नसल्याचं सांगितलं आहे. तसंच, विद्यार्थ्यांची परीक्षा संपत नाहीत तो पर्यंत चौकशी न करण्याचे आदेश महाविद्यालयानं दिले आहेत. या प्रकरणात पश्चिम उपनगरातील महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.


तीन सदस्यीय समिती

दरम्यान, मुंबई विद्यापीठानं या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीनं चौकशी केली असता व्हॉट्सअप ग्रुपवर असलेली उत्तर चुकीची असल्याचं स्पष्ट झालं.



हेही वाचा -

पूर्वसूचना न देताच हार्बरवर ब्लॉक, प्रवासी अर्धा तास ट्रेनमध्येच अडकले

मेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम ४५ टक्के पूर्ण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा