मेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम ४५ टक्के पूर्ण

मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प असलेल्या मेट्रो -३ प्रकल्पाच्या कामानं गती पकडली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचं भुयारी करणाचं काम ४५ टक्के पूर्ण झालं आहे. तसंच, या मार्गातील एकूण ३२ भुयारांपैकी ९ भुयारांचं काम पूर्ण झाली आहेत.

SHARE

मुंबईतील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्प असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामानं गती पकडली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचं भुयारी करणाचं काम ४५ टक्के पूर्ण झालं आहे. तसंच, या मार्गातील एकूण ३२ भुयारांपैकी ९ भुयारांचं काम पूर्ण झालं आहेत. ३३.५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गासाठी २३१३६ कोटी रुपये खर्च येणार आहे.


पहिला टप्पा २०१२ पर्यंत सुरू

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारी करणाचं काम पूर्ण झाल्यावर या मार्गातील आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स हा पहिला टप्पा २०१२ पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते कफ परेड हा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. मेट्रो-३ च्या २३.६९ किलोमीटरचं भुयारीकरण मागील मार्च अखेरपर्यंत पूर्ण झाल्याचं समोर येत आहे.


१७ टनेल बोअरींग मशिन्स

भुयारीकरणाच्या कामासाठी विविध ठिकाणी १७ टनेल बोअरींग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरवण्यात आल्या आहेत. मागील मार्च महिन्यात गोदावरी-१ या टीबीएम मशिनद्वारे डोमेस्टीक एअरपोर्ट मेट्रो स्थानकापर्यंतचं २.९ किलोमीटरचं भुयारीकरण ४५५ दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे.हेही वाचा -

कर्मचारी नसल्यानं चिंचपोकळी स्थानकातील तिकीट खिडकी बंद

बोरिवलीतील बाचाबाचीप्रकरणी उर्मिला मातोंडकरविरोधात तक्रार दाखलसंबंधित विषय
ताज्या बातम्या